देवीसाठी तांदळाच्या खीरचा नैवेद्य दाखवू शकता. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती सविस्तर जाणून घेऊया.
अर्धा कप तांदूळ, 1 लीटर दूध, अर्धा कप साखर, केशर, पाव चमचा वेलची पावडर, सुका मेवा
सर्वप्रथम तांदूळ धुवून 15 मिनिटे भिजत ठेवा.
एका भांड्यात दूध उकळून घेऊन त्यामध्ये तांदूळ घाला.
तांदूळ आणि दूध मंद आचेवर शिजवताना चमचाने हलवत राहा.यानंतर खीरसाठीचे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवण्यास ठेवा.
खीरच्या मिश्रणात साखर आणि केशर घालून सर्व सामग्री व्यवस्थितीत मिक्स करा.खीरवर वरुन वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स घालून पुन्हा ढवळा.
पाच मिनिटे खिरीला उकळ आल्यानंतर गॅस बंद करा आणि एका भांड्यात काढून घ्या. खीर वाटीत काढून देवीला त्यचा नैवेद्य दाखवा.