दिवाळीच्या वेळी घराला सजावट करण्यासाठी लिफ प्रिंट असणारा पडदा खरेदी करू शकता. अशाप्रकारचा पडदा 1 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.
घराला सिंपल आणि सोबर लूक देण्यासाठी घराच्या खिडकीला किंवा बेडरुममधील खिडकीला असा पडदा लावू शकता. या पडद्याच्या डिझाइनमध्ये वेगवेळे रंग आणि पॅटर्न पहायला मिळतील.
सध्या फ्लोरल प्रिंट पडद्याचा ट्रेन्ड आहे. असे पडदे घराला सिंपल आणि रिच लूक देतात. ऑनलाइन किंवा मार्केटमध्ये अशाप्रकारचा पडदा 2 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.
दिवाळीत घराच्या सजावटीवेळी हटके पडदे लावण्याचा विचार करत असल्यास फ्रिल वर्क करण्यात आलेला पडदा खरेदी करू शकता. या पडद्यावर सोनेरी रंगातील लाइट सोडून दिवाळीचा सण साजरा करू शकता.
घराच्या खिडकीला दिवाळीत नवा पडदा खरेदी करण्यासाठी प्रिंटेड पडद्याची डिझाइन पाहू शकता. अशाप्रकारचा पडदा 1 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.
सध्या कॉटन पडद्यांचाही ट्रेन्ड असल्याने दिवाळीत अशाप्रकारचा पडदा खिडकीला लावू शकता.
यंदाच्या दिवाळीत घराच्या सजावटीवेळी खिडकीला डिजिटल प्रिंट पडदा लावू शकता. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाइन ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने खरेदी करता येतील.