Lifestyle

भारतातील अनोखे देवस्थान, मंदिराच्या पायभरणीसाठी पाणी नव्हे वापरलेय तूप

Image credits: wikipedia@Vivek B Govindaraju

मंदिराच्या पायाभरणीसाठी तूपाचा वापर

एखाद्या मंदिराची पायाभरणी करताना पाणी व अन्य वस्तूंचा वापर केला जातो. पण राजस्थानमधील एका मंदिराचा पाया उभारताना चक्क तूपाचा वापर केलाय.

Image credits: wikipedia@Vivek B Govindaraju

राजस्थानमधील अनोखे मंदिर

राजस्थानमधील बीकानेर येथे भांडसर जैन मंदिर जैन धर्मातील 5वे तीर्थंकर भगवान सुमतिनाथ यांना समर्पित आहे. हे मंदिर अत्यंत सुंदर आहे.

Image credits: wikipedia@Vivek B Govindaraju

40 हजार तूपाचा वापर

भांडसर जैन मंदिराची पायाभरणी करण्यासाठी जवळजवळ 40 हजार किलोच्या तूपाचा वापर करण्यात आला होता. या मंदिराचा इतिहास 500 वर्ष जुना आहे.

Image credits: wikipedia@Vivek B Govindaraju

वर्ष 1468 मध्ये सुरु झाले होते बांधकाम

इतिहासकारांनुसार, वर्ष 1468 मध्ये भांडा शाह नावाच्या व्यापाऱ्याने मंदिराचे बांधकाम सुरु केले होते. पण मंदिर पूर्ण होण्याआधीच व्यावसायिकाचा मृत्यू झाला.

Image credits: wikipedia@Vivek B Govindaraju

असे पडले नाव

भांड शाहच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलीने वर्ष 1541 मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. भांडाशाह जैन यांच्याद्वारे उभारल्या जाणाऱ्या मंदिराचे नाव व्यावसायिकावरुन ठेवण्यात आले.

Image credits: wikipedia@Vivek B Govindaraju

चहूबाजूंना सुंदर चित्रकला

भांडसर जैन मंदिराच्या चहूबाजूंना सुंदर चित्रकला करण्यात आली आहे. यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिक वाढले गेले आहे.

Image credits: wikipedia@Vivek B Govindaraju