महाराष्ट्रातील घरांमध्ये दिवसाची सुरुवात ही चहाने केली जाते. अनेक घरांमध्ये चहाला मान सन्मानाचं स्थान असल्याचं आपल्याला माहित आहे. चहा बनवायची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का?
आलं आणि इलायची चहापत्ती टाकत असताना त्यामध्ये टाकत जा. हे तीनही पदार्थ एकाच वेळेस उकळून घेतल्यास चहाचा स्वाद चांगला येतो.
इलायचीला चहापत्तीसोबत टाकत जा, त्यामुळे दोनही पदार्थांचा चांगला आस्वाद चहा घेताना येतो. इलायची चहामध्ये टाकल्यानंतर त्याचा वास संपूर्ण घरात येतो.
आल्याला चहा बनवताना पाणी उकळायला ठेवल्यावर त्यामध्येच टाकावं, त्यामुळे आल्याचा संपूर्ण स्वाद हा चहामध्ये मिक्स होत असतो.
दूध टाकल्यानंतर आलं किंवा इलायची टाकू नका, त्यामुळं या दोनही पदार्थांचा त्यामध्ये स्वाद येत नाही. आधी टाकल्यानंतर या दोन्ही पदार्थांचा स्वाद यायला मदत होते.