घराच्या सुख-समृद्धीसाठी नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या वेगवेगळ्या स्वरुपांची मनोभावे पूजा-आरती करावी. यावेळी देवीला खास नैवेद्य दाखवावा.
देवी चंद्रघंटेच्या पूजेवेळ सर्व गोष्टी विधीवत झाल्या पाहिजे. यामुळे घरता सुख-समृद्धीसह धनप्राप्ती होते. जाणून घेऊया देवीला कोणता नैवेद्य दाखवावा.
घरातील क्लेश आणि कामात यश मिळत नसल्यास देवी चंद्रघंटेला दूध आणि तांदळापासून तयार केलेल्या खीरचा नैवेद्य दाखवावा. सकाळी पूजा केल्यानंतर तांदळाच्या खीरचा नैवेद्य दाखवू शकता.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेसाठी खीरचा नैवेद्य तुम्ही स्वत:, पत्नी किंवा आई तयार करू शकते. खीरमध्ये ड्राय फ्रुट्ससह केशरही घाला.
खीरमध्ये केशर घातल्याने देवी चंद्रघंटा प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मक उर्जा येईल. याशिवाय घरात होणारे क्लेश दूर होत घराची भरभराट होईल.