थंडीच्या दिवसात मसालेदार आणि हेल्दी खायचे मन करत असल्यास झटपट तयार होणारी एग फ्राय रेसिपी तयार करू शकता. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पुढे सविस्तर पाहूया...
6-7 उकडलेली अंडी, अर्धा कप तेल, 2 कांदे, 4-5 हिरव्या मिरची, कढीपत्ता, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, जीर-धणे पावडर, गरम मसाला, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ.
सर्वप्रथम गॅसवर तवा ठेवून त्यामध्ये तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर उकडलेली अंडी दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत हलक्या हाताने फ्रा. करा.
तव्यामधील तेलात कांदा आणि मिचरी भाजून घ्या. यानंतर लाल तिखट, धणे-जीरे पावडर घालून सर्व सामग्री एकत्रित मिक्स करा.
तव्यामधील मसाल्याच्या ग्रेव्हीमध्ये थोड पाणी घालून घट्ट ग्रेव्ही तयार करत 2-3 मिनिटे शिजण्यास ठेवा.
तव्यामधील मसाल्यामध्ये थोड अजून तेल घाला आणि फ्राय केलेली अंडी घालून घ्या. सर्व सामग्री पुन्हा एकदा व्यवस्थितीत मिक्स करुन शिजण्यास ठेवा.
तवा एग फ्राय 10 मिनिटे शिजवल्यानंतर गरमागरम भात किंवा पोळीसोबत खाण्यास सर्व्ह करा.