मित्र हा प्रामाणिक असावा, जो तुमच्या यशावर आनंदी होईल आणि अपयशात साथ देईल.
मित्र सुशिक्षित आणि योग्य निर्णय घेणारा असावा, जो तुमचं चांगल्या मार्गावर मार्गदर्शन करेल.
मित्र हा तुमचं मनोबल वाढवणारा आणि तुमच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा असावा.
संकटाच्या काळात घाबरणारा किंवा तुमचा विश्वासघात करणारा नसावा. त्याचं वर्तन नेहमी स्थिर आणि शांत असावं.
मित्र असा असावा, जो तुमच्याशी स्वार्थाशिवाय नातं ठेवतो. केवळ फायद्यासाठी जवळ येणाऱ्यांपासून दूर राहावे.
चाणक्य म्हणतो की, मित्र निवडताना अत्यंत सावधगिरीने निवड करावी कारण चुकीचा मित्र आयुष्यात मोठे नुकसान करू शकतो.
नवीन वर्षात असे मित्र निवडावेत, जे तुमचं जीवन अधिक सकारात्मक आणि आनंददायी बनवतील.