आचार्य चाणक्य हे भारतातील महान विद्वानांपैकी एक होते. त्यांची निती आजही आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्याच्या सल्ल्यांचा आपल्या जीवनात अवलंब केल्याने आपण अनेक समस्या टाळू शकतो.
चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये अशा ३ गोष्टी सांगितल्या आहेत, तुम्ही त्या जितक्या जास्त कराल तितके जास्त फायदे मिळतात. जाणून घ्या कोणती आहेत ती ३ कामे.
आचार्य चाणक्य यांच्या मते, तुम्ही कितीही अभ्यास करा, पदवी मिळवा, मात्र त्यानंतरही अभ्यास थांबवू नये. एखाद्याने नेहमी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपले ज्ञान वाढवत राहिले पाहिजे.
जर आपण आचार्य चाणक्यांच्या सल्ल्याचे पालन केले तर आपल्याला जेवढे दान करता येईल तेवढे दान करावे. दानामुळे गरजु व्यक्तीला मदत होते.
मंत्रजप करताना साधकांनी कधीही आत्मसंतुष्ट होऊ नये. एखादा मंत्र सिद्धीस गेला असला तरी त्याची सिद्धी कायम राहावी म्हणून त्याचा सतत आचरण करावा.