उन्हाळ्यात आहाराविषयी योग्य खबरदारी घेणे महत्वाचे आहे. या ऋतूत पचनसंस्था, शरीराच्या इतर भागांशी संबंधित समस्या वाढू शकतात. काही भाज्या ज्यांना उन्हाळ्यात टाळणे चांगले ठरते.
लसूण उष्ण स्वभावाचा असतो. त्याचे जास्त सेवन शारीरिक उष्णतेची समस्या आणू शकते. उन्हाळ्यात लसूण खाल्ल्याने त्वचेशी संबंधित समस्या, शरीराचे तापमान वाढू शकते. त्याचे सेवन टाळा.
उन्हाळ्यात कच्चा कांदा खाल्ल्याने पचनसंस्था त्रासलेली होऊ शकते. कांद्यात असलेल्या उष्ण गुणधर्मामुळे गॅस, पोटफुगी होऊ शकते. जर कांदा खालचायचा असेल, तर त्यात लिंबाचा रस मिसळून खा.
फुलकोबी उष्ण स्वभावाची आहे. त्यामुळे त्याचे सेवन तुम्ही उन्हाळ्यात टाळावे. फुलकोबीच्या सेवनामुळे शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते, गॅस, अपचन आणि पोटफुगीसारख्या समस्या वाढू शकतात.
आले उष्ण स्वभावाचे असते. त्याचे सेवन जास्त प्रमाणात केल्याने शरीरात उष्णता वाढू शकते. गॅस, पोटफुगीची समस्या होऊ शकते. उन्हाळ्यात आले टाळून तुम्ही इतर ताज्या, हलक्या भाज्या खाऊ शकता
उन्हाळ्यात मशरूम खाणे टाळा. कारण त्याच्या सेवनामुळे अॅलर्जी किंवा शरीरावर प्रतिकूल प्रतिक्रिया होऊ शकतात. मशरूम हे जरा जड असते आणि त्यामुळे पचनात अडचणी निर्माण होऊ शकतात.