उन्हाळ्यात थेट सूर्यप्रकाशात जास्त वेळ व्यायाम करणे टाळा. सकाळी ५:३० - ७:३० किंवा संध्याकाळी ६:०० - ८:०० यावेळेत 30-40 मिनिटे वेगाने चालणे फायदेशीर ठरते.
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा सर्वोत्तम व्यायाम. पचनसंस्था सुधारते, शरीराची लवचिकता वाढते आणि संपूर्ण बॉडी वर्कआउट होते. 30-45 मिनिटे पोहणे हे कार्डिओसाठी उत्तम पर्याय आहे.
उन्हाळ्यात हलका आणि सौम्य व्यायाम करणे आवश्यक आहे. प्राणायाम, शवासन, भस्त्रिका, अनुलोम-विलोम यामुळे शरीर शांत आणि थंड राहते. सूर्यनमस्कार हा उत्तम स्ट्रेचिंग व्यायाम आहे.
सकाळी लवकर किंवा संध्याकाळी 30-40 मिनिटे सायकलिंग केल्याने हृदय, पाय आणि फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कॅप आणि सनग्लासेस वापरा.
उन्हाळ्यात जड वजन उचलण्यापेक्षा हलक्या डंबेल्सने (2-5 kg) वर्कआउट करणे चांगले. बायसेप्स कर्ल्स, ट्रायसेप्स डिप्स, स्क्वॅट्स, लंजेस हे हलके व्यायाम करा.