उन्हाळ्यात बर्फवृष्टीची मजा कुठे लुटता येईल असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होते. अशातच पुढील दोन ठिकाणी तुम्हाला उन्हाच्या कडाक्यापासून आराम देत बर्फवृष्टीचा आनंद घेता येईल.
उन्हाळ्यात बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा असल्यास रोहतांग पासला नक्की भेट देऊ शकता. येथे एकदा गेल्यानंतर पुन्हा आपल्या घरी यावेसे वाटत नाही.
3980 मीटर उंचीवर रोहतांग पास आहे. येथे आल्यानंतर तेथील निर्सगाचे सौंदर्य पाहून त्याच्या मोहात पडता. रोहतांग पासला फिरण्यासाठी देश-परदेशातून पर्यटक येत राहतात.
रोहतांग पासजवळ काही अॅडवेंचर्स अॅक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. स्केटिंग आणि पॅराग्लाइडिंगची मजा घेऊ शकता.
काश्मीरमधील बहुतांश ठिकाणी उन्हाळ्यात बर्फवृष्टी होत नाही. पण द्रास येथे तुम्हाला बर्फवृष्टीचा आनंद घेता येईल.
द्रास समुद्रसपाटीपासून 3300 मीटर उंचीवर आहे. येथील तापमान फार कमालीचे असते. मित्रपरिवारासोबत तुम्ही नक्कीच द्रासच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता.