Marathi

Ram Navami च्या दिवशी राशीनुसार करा हे उपाय, आयुष्यात येईल सुख-समृद्धी

Marathi

यंदा राम नवमी 17 एप्रिलला

यंदा राम नवमी 17 एप्रिलला साजरी केली जाणार आहे. या दिवशी राशीनुसार काही उपाय केल्यास आयुष्यात सुख-समृद्धी येऊ शकते. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर...

Image credits: adobe stock
Marathi

मेष राशी

मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. या राशीच्या व्यक्तींनी राम नवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांना लाल रंगाची फळ किंवा मिठाईचा नैवेद्य दाखवावा. 

Image credits: freepik
Marathi

वृषभ राशी

वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींनी श्रीरामांना दूधापासून तयार केलेली मिठाई नैवेद्य म्हणून दाखवावी.

Image credits: freepik
Marathi

मिथुन राशी

मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. यामुळे राम नवमीच्या दिवशी श्रीरामांना हिरव्या रंगाची फळं अर्पण करा. अशातच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

Image credits: freepik
Marathi

कर्क राशी

कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीच्या व्यक्तींनी श्रीरामांना माव्यापासून तयार केलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यामुळे आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील.

Image credits: freepik
Marathi

सिंह राशी

सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशीतील व्यक्तींनी भगवान श्रीरामांना गुळ किंवा त्यापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने समाजात मान-सन्मान वाढेल.

Image credits: freepik
Marathi

कन्या राशी

कन्या राशीच्या व्यक्तींचा स्वामी बुध आहे. या राशीच्या व्यक्तींनी राम नवमीला सुकामेवा किंवा त्यापासून तयार करण्यात आलेल्या मिठाईचा भोग दाखवा. यामुळे आयुष्यात सुख-समृद्धी येईल.

Image credits: freepik
Marathi

तुळ राशी

तुळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. या राशीच्या व्यक्तींनी चांदीचा वर्ख लावलेली कोणतीही मिठाई प्रभू श्रीरामांना नैवेद्य म्हणून दाखवावा.

Image credits: freepik
Marathi

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा स्वामी ग्रह मंगळ आहे. या राशीच्या व्यक्तींनी श्रीरामांना इमरतीचा भोग दाखवावा. यामुळे ग्रहासंबंधित शुभ फळ मिळेल.

Image credits: freepik
Marathi

धनु राशी

धनु राशीचा स्वामी गुरू आहे. या राशीतील व्यक्तींनी राम नवमीला बेसनापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य श्रीरामांना दाखवावा.

Image credits: freepik
Marathi

मकर राशी

मकर राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. या राशीतील व्यक्तींना डार्क कलरमधील मिठाई नैवेद्य म्हणून दाखवावी.

Image credits: freepik
Marathi

कुंभ राशी

कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. या राशीतील व्यक्तींनी श्रीरामांना चिकूची फळ अर्पण करावीत.

Image credits: freepik
Marathi

मीन राशी

मीन राशीचा स्वामी ग्रह गुरू आहे. या राशीतील व्यक्तींनी राम नवमीच्या दिवशी केळी किंवा पिवळ्या रंगातील कोणतीही फळं श्रीरामांना अर्पण करावीत.

Image credits: freepik
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Our own

वृंदावन का सोडत नाही प्रेमानंद महाराज ? काय आहे रहस्य

अष्टमीच्या दिवशी ट्राय करा परिणितीसारख्या साड्या, देवी होईल प्रसन्न

मुकेश अंबानी यांची उंची किती ? संपूर्ण कुटुंबात सर्वात उंच कोण ?

भूमी पेडणेकरचे 10 एव्हरग्रीन ब्लाऊन डिझाइन, देतील बोल्ड लुक