बर्गर बेस, कॉर्न फ्लोअर, उकडलेले बटाटे, गाजर, ब्रेड क्रम्ब्स, जीरे पावडर, चाट मसाला, लाल तिखट, कोथिंबीर, हिरवी चटणी, मेयोनीज, कांदा, टोमॅटो, चीझ, गरजेनुसार तेल व चवीनुसार मीठ.
सर्वप्रथम एका बाउलमध्ये उकडलेले बटाटे घेऊन त्यामध्ये वाटाणे, गाजर स्मॅश करुन घ्या. यानंतर कॉर्न फ्लोअर मिक्स करा.
लाल मिरची पावडर, जीरे पावडर, चाट मसाला. कोथिंबीर आणि ब्रेड क्रम्ब्स बटाट्याच्या मिश्रणात मिक्स करुन गोलाकार टिक्की तयार करा.
बर्गर बेसचे दोन भाग करा आणि तव्यावर गरम करा. एका बाजूला हिरवी चटणी मेयोनीज लावा.
दुसऱ्या बाजूला तव्यावर बर्गरची टिक्की दोन्ही बाजूने सोनेरी रंगात भाजून घ्या. भाजून झाल्यावर बर्गरच्या बेसवर टिक्की ठेवा.
बर्गरच्या टिक्कीवर टोमॅटो, कांदा आणि चीझ घाला आणि दुसऱ्या बर्गर बेसने बंद करा. अशाप्रकारे स्ट्रीट स्टाइल बर्गर घरातील मंडळींना संध्याकाळच्या नाश्तासाठी सर्व्ह करा.