व्यक्तीच्या शरीरात 70 टक्क्यांहून अधिक पाणी असते. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास डिहाइड्रेशनची समस्या उद्भवू शकते. अशातच पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे.
दररोज 2-3 लीटर पाणी प्यावे. यामुळे शरीर हाइड्रेट राहण्यास मदत होते.
उन्हाळ्याच्या दिवास अत्याधिक पाणी प्यावे. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणार नाही.
ज्या व्यक्तींना अधिक घाम किंवा वर्कआउट करतात त्यांनी 3-4 लीटर पाणी प्यावे.
शरीराच्या वजनानुसार पाणी प्यावे असा सल्ला दिला जातो. तर तुमचे वजन 20 किलो असल्यास त्यानुसार 1 लीटर दररोज पाणी प्यावे.
तहान लागल्यावर पाणी पिणे टाळू नका. यामुळे डोकेदुखी किंवा चक्कर येण्याची समस्या उद्भवू शकते.
दिवसभरात थोडे थोडे पाणी प्या. जेवणापूर्वी अर्धा तास आधी आणि जेवणानंतर 1 तासाने पाणी प्यावे.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.