उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्याची खास काळजी घेतली पाहिजे. तळलेले व मसालेदार पदार्थांचे उन्हाळ्याचे सेवन करणे टाळा. अन्यथा पोटात गॅस होऊ शकतो. यापासून दूर राहण्यासाठी उपाय जाणून घ्या.
केळ्यामध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात. यामुळे अॅसिड रिफ्लक्स कमी करण्यासह पोटातील गॅसची समस्या दूर होऊ शकते.
लवंगाचे सेवन केल्याने पोटातील गॅसची समस्या होऊ शकते. याशिवाय बद्धकोष्ठतेचीही समस्या दूर होऊ शकते.
अॅपल सायडर व्हिनेगरच्या सेवनाने पोटातील गॅसची समस्या दूर होऊ शकते. यासाठी एक ग्लास पाण्यात दोन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर मिक्स करून प्या.
पोटात गॅस निर्माण झाल्यास एक ग्लास ताक प्या. यामध्ये एक चिमूटभर जीरे पावडर आणि ब्लॅक सॉल्ट मिक्स करा. यामुळे पोटातील उष्णता कमी होण्यास मदत होईल.
पोटात गॅसची समस्या निर्माण झाल्यास पुदीन्याचे सेवन करा. यामुळे पोटात थंडावा निर्माण होईल.
बडीशेप पाण्यात उकळवून थंड झाल्यानंतर प्या. याचे दररोज सेवन केल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर होईल.
पोटात गॅसची समस्या निर्माण झाल्यास हिंगाचे पाणी पिऊ शकता. कोमट पाण्यासह हिंगाचे सेवन करा.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.