स्लीप डिवोर्स एका लहान कलावधीसाठी पती-पत्नी घेतात. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास पुरेशी झोप घेण्यासाठी कपलमध्ये सध्या स्लीप डिवोर्सचा ट्रेण्ड सुरू झाला आहे. याबद्दलच जाणून घेऊया…
कपलमध्ये झोपण्याच्या वेळा वेगवेगळ्या असणे, पार्टनरचे घोरणे किंवा एका पार्टनरला अंधाऱ्या खोलीत अथवा दिव्याच्या प्रकाशात झोपणे आवडते या काही कारणांमुळे स्लीप डिवोर्स घेतला जातो.
स्लीप डिवोर्स किती वेळासाठी घ्यावा याची वेळ फिक्स नसते. प्रत्येक स्थितीनुसार दीर्घ किंवा कमी कालावधीसाठी स्लीप डिवोर्स घेतला जातो.
कामाच्या तणापासून दूर राहत पूर्ण झोप होण्यासाठी आजकाल तरुण कपलही स्लीप डिवोर्सचा पर्याय निवडत आहेत.
स्लीप डिवोर्सचा अर्थ असा नाही की, एकमेकांपासून विभक्त होणे. केवळ काही कालावधीसाठी एकमेकांपासून दूर राहणे. याचा खासगी आयुष्यात किंवा नात्यात दूरावा येण्याच्या समस्या उद्भवत नाहीत.
स्लीप डिवोर्समुळे झोप पूर्ण होते, मानसिक आणि शारिरीक आरोग्य संतुलित राहते, कपलला पर्सनल स्पेस मिळते आणि नातेही मजबूत होण्यास मदत होते.