Marathi

Akshay Tritiya च्या दिवशी सोनं खरेदी करणे का शुभ मानले जाते?

Marathi

प्रत्येक सणासंबंधित परंपरा

हिंदू धर्मात प्रत्येक सण-उत्सवासंदर्भात एक परंपरा आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशीही एक परंपरा पार पाडली जाते. खरंतर, सोन्याची खरेदी केली जाते. यामागील कारण जाणून घेऊया...

Image credits: Getty
Marathi

कधी आहे अक्षय्य तृतीया?

यंदा अक्षय्य तृतीया 10 मे, शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. ज्योतिष शास्रानुसार, अक्षय्य तृतीयेचा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. यामुळे कोणतेही कार्य मुहूर्त न पाहता केली जाऊ शकतात.

Image credits: Getty
Marathi

सोनं खरेदी करण्याची परंपरा

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे. खरंतर, या दिवशी केलेले जात अक्षय्य असते अशी अख्यायिका आहे. यामुळेच क्षय न पावणारा या आशेने दान धर्म केला जातो.

Image credits: Getty
Marathi

गुरु ग्रहाचा धातू

ज्योतिष शास्रानुसार, सोनं गुरू ग्रहाचा धातू आहे. गुरूचे आशीर्वाद आणि आयुष्यात शुभ फळ मिळवण्यासाठई सोन खरेदी करणे, त्याची पूजा व दान करण्याचे विशेष महत्त्व आहे.

Image credits: Getty
Marathi

घरात सुख-समृद्धी येते

मान्यत आहे की, अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते. कोणत्याही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत नाही. यामुळेच अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करतात.

Image credits: Getty
Marathi

सोन्याची पूजा

अक्षय्य तृतीयेला सोन्याची पूजा केली जाते. घरातील सोन्याचे दागिने किंवा अन्य वस्तूंची पूजा करू शकता.

Image credits: Getty
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image Credits: Getty