केसांना फाटे फुटल्यानंतर बहुतांशजण केस कापणे अथवा ट्रिम करण्याचा सल्ला देतात. या समस्येवर तुम्ही घरगुती उपाय करू शकता. यासाठी केवळ 2 पॅकचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते.
केसांना फाटे फुटण्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी एलोवेरा जेल आणि कॅस्टर ऑइलचा वापर करू शकता.
3 चमचे एलोवेराल जेलमध्ये 2 चमचे कॅस्टर ऑइल मिक्स करुन घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट फाटे फुटलेल्या ठिकाणी अर्धा तास ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
केसांना फाटे फुटण्याच्या समस्येवर केळ्याचा पॅक लावू शकता. याशिवाय केसांसंदर्भातील काही समस्याही दूर होतात.
केळ्याचा पॅक तयार करण्यासाठी दही, लिंबाचा रस आणि गुलाब पाण्याचा वापर करुन केळ स्मॅश करून घ्या. सर्व गोष्टी व्यवस्थितीत मिक्स केल्यानंतर केसांना अर्धा तास लावा.
केसांसाठी अयोग्य शॅम्पू, कंडीशनर अथवा अन्य हेअर प्रोडक्ट्सचा वापर केल्याने फाटे फुटण्याची समस्या उद्भवसू शकते.