अंत्यसंस्कानंतर घरी आल्यानंतर कोणती 4 कामे करावीत?
एखाद्याच्या अंत्यसंस्कारानंतर घरी परतल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. याशिवाय काही कामेही करणे महत्त्वाचे असते. याबद्दल जाणून घेूऊया सविस्तर..
स्मशानातून घरी परतल्यानंतर अन्य व्यक्तीच्या संपर्कात येऊ नका. याशिवाय एखाद्या ठिकाणी न थांबण्यासह कोणालाही स्पर्श करू नका.
तुमच्या हातात पूजा धागा असल्यास स्मशानभूमीतून घरी आल्यानंतर काढून टाका. यानंतर धागा एखाद्या नदीत- तलावात विसर्जन करा.
स्मशानातून घरी आल्यानंतर आंघोळ नक्की करा. नदीवर स्नान करणे शक्य नसल्यास घरी आंघोळ करा. स्नान केल्याशिवाय शरीर शुद्ध होत नाही.
तुमच्याकडे वेळ असल्यास आंघोळ केल्यानंतर थोडावेळ मंत्रांचा जाप करावा. अथवा देवाला नमस्कार करा.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.