ईस्टर संडे का साजरा करतात?
ईस्टर संडे ख्रिस्ती बांधवांचा प्रमुख सण आहे. जगभरात ईस्टर संडेचा सण मोठ्या आनंद-उत्सवात साजरा केला जातो. येत्या 31 मार्चला ईस्टर संडे साजरा केला जाणार आहे.
ख्रिस्ती धर्मियांमध्ये होली वीक म्हणजेच पवित्र आठवड्याची मान्यता आहे. यामध्ये पाम संडे, गुड फ्रायडे, होली सॅडरडे व ईस्टर संडे असे दिवस साजरे करतात.
अशी मान्यता आहे की, सुळावर चढवल्यानंतर प्रभू येशू चमत्कारी रूपाच पुनर्जिवीत झाले होते. या दिवशी रविवार होता. तेव्हापासून ईस्टर संडे साजरा केला जातो.
ईस्टर संडेच्या दिवशी चर्चला विशेष सजावट आणि रोषणाई केली जाते. याशिवाय ख्रिस्ती बांधव सजवलेल्या मेणबत्त्या आपल्या घरी पेटवण्यासह मित्रपरिवाला वाटण्याची परंपरा पार पाडतात.
ख्रिस्ती मान्यतेनुसार, प्रभू येथू पुन्हा जीवंत झाल्याचे रियम मगदलीनी नावाच्या महिलेने पाहिले होते. यानंतर मगदलीनीने सर्व महिलांना प्रभू येशूंबद्दल सांगितले होते.
ईस्टर संडेच्य दिवशी अंड्यांवर विशेष रुपात सजावट केली जाते. खरंतर अंडी फार शुभ मानली जातात. काहीजण अंड्यांच्या आकारातील गिफ्टही एकमेकांना देतात.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.