अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. यामुळे कुंडलीतील पितृदोष दूर होऊ शकते. या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत याबद्दल जाणून घेऊया...
अमावस्येच्या दिवशी पितरांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी पूजा-प्रार्थना केली जाते. यामुळे चुकूनही अमावस्येला पितरांना अपशब्दांचा वापर करू नये. याशिवाय पितरांचे तर्पणही करा.
अमावस्येच्या दिवशी घरात वाद-भांडणे करणे टाळावेत. एखाद्याचे मनही अमावस्येला दुखावू नये.
अमावस्येच्या दिवशी तामसिक पदार्थांपासून दूर रहावे. यावेळी मांसाहर, मद्यपान चुकूनही करू नये. यामुळे पितृदोष अधिक वाढू शकतो.
अमावस्येच्या दिवशी केलेल्या पूजा-प्रार्थनेचे फळ मिळण्यासाठी संपूर्ण दिवस ब्रम्हचार्याचे पालन करावे. अन्यता पूजेचे फळ मिळत नाही.
अमावस्येच्या दिवशी पितरांचे पिंडदान, तर्पण आणि दान-पुण्य आणि श्राद्ध करावे. अन्यथा पितृदोष वाढण्यासह ते नाराज होतात.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.