गटारीसाठी चिकनसोबत कोंबडी वड्यांचा बेत हमखास केला जातो. प्रत्येकाची कोबंडी वडे तयार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. अशातच इन्स्टंट कोंबडी वडे तयार करण्याची खास रेसिपी पाहणार आहोत.
1 वाटी तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ, चण्याच्या डाळीचे पीठ, अर्धी वाटी उडदाची डाळ, मेथी दाणे, चवीनुसार मीठ, हळद, तीळ, धणे, काळीमिरी, जीरे आणि तेल.
सर्वप्रथम उडदाची डाळ आणि मेथीचे दाणे सकाळी 2 ते 3 तास भिजत ठेवा. यानंतर मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करुन घ्या.
तव्यावर धणे-जीरे आणि काळीमिरी भाजून घेत त्याची पावडर तयार करा. आता गव्हाचे, डाळीचे, ज्वारीचे आणि तांदळाच्या पीठात वड्यांसाठी तयार केलेली पेस्ट मिक्स करा.
वड्यांच्या पीठात धणे-जिरे पावडरसह काळीमिरी पावडर आणि तीळ घालून सर्व पीठ व्यवस्थितीत एकजीव करून घ्या. यानंतर कोमट पाणी वड्यांच्या पीठात मिक्स करुन घट्ट पीठ मळून घ्या.
वड्यांचे पीठ दोन तास झाकून ठेवा. पीठ तयार केल्यानंतर लगेच वडे तयार करू नका. दोन तासांनंतर पीठाचे बारीक गोळे करून घ्या. यानंतर हाताला तेल लावून गोलाकार वडे तयार करा.
गरम तेलात हलक्या हाताने वडे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. इन्स्टंट आणि खुसखुशीत कोंबडी वडे तयार होतील. गरमागरम चिकनसोबत या वड्यांमुळे नॉन-व्हेजचा बेताचा आस्वाद घ्या.