भारतातील महान नीतिशास्र आचार्य चाणाक्य यांनी आंघोळीचे महत्व सांगितले आहे. जाणून घेऊया कोणती कामे केल्यानंतर लगेच आंघोळ करावी.
चाणाक्यांनुसार, एखाद्याच्या अंत्यसंस्कारावरुन आल्यास घरात प्रवेश करण्याआधी लगेच आंघोळ करावी.
असे न केल्यास तुम्ही आजारी पडू शकता. कारण मृत शरीरावरील बॅक्टेरियामुळे आरोग्याला नुकसान पोहोचले जाऊ शकते.
चाणाक्यांनुसार, केस कापल्यानंतर स्नान करणे आवश्यक आहे. जेणेकरुन अंगाला चिकटलेले केस निघून जातील.
चाणाक्यांनुसार, तेलाने मसाज केल्यानंतर लगेच आंघोळ करावी. असे न केल्यास मसाजवेळी ओपन पोर्समधील बाहेर आलेली घाण आरोग्याला नुकसान पोहोचवू शकते.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.