घरामध्ये प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी एक विशिष्ट स्थान असते. यानुसारच वस्तू ठेवाव्यात. अशातच घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्यात असा प्रश्न पडलाय तर जाणून घेऊया पुढे...
ज्योतिष शास्रानुसार, चांदीचा रंग पांढरा असतो. हा रंग चंद्राचे प्रतीक मानले जाते. अशातच चंद्राची दिशा चांदीच्या वस्तू ठेवण्यासाठी योग्य आहे.
घरात चांदीच्या वस्तू अथवा ज्वेलरी असल्यास त्या घरातील पश्चिम दिशेला ठेवाव्यात. यामुळे तुम्हाला काही लाभ मिळू शकतात.
घरात चांदीच्या वस्तू ठेवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. चांदीचे सामान नेहमीच लाल कापडात गुंडाळून ठेवावेत. यामुळे चंद्राची स्थिती कुंडलीत मजबूत होते. मानसिक तणावही दूर होतो.
चांदीच्या वस्तू लाल कापडात गुंडाळून पश्चिम दिशेला ठेवल्यास चंद्रामुळे आयुष्यात सकारात्मक बदल झालेले दिसून येतात.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.