यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तयार करा तिरंगा खीर ते सॅलड रेसिपी
तिरंग्यातील नारंगी रंगासाठी गाजर, पांढऱ्या रंगासाठी काकडी आणि हिरव्या रंगासाठी ढोबळी मिरची वापरुन तिरंगा सॅलड तयार करू शकता.
सर्वप्रथम खीरसाठी तिरंग्यातील तीन रंगाचा वापर करून तीन लेअर तयार करून घ्या. खीरच्या प्रत्येक लेअरला नारंगी, पांढरा आणि हिरवा रंग येण्यासाठी फूड कलरचा वापर करू शकता.
तिरंगा सॅण्डविचसाठी किसलेला गाजर, मेयोनीज मिक्स करुन ब्रेडवर पसरवा. यानंतर पनीर किंवा चीजचा वापर करुन पांढऱ्या रंगातील लेअर तयार करा. हिरव्या रंगातील लेअरसाठी पालकचा वापर करा.
तिरंगा पुलावसाठी नारंगी, हिरवा आणि पांढऱ्या रंगातील बासमती तांदूळचा वापर करून भात तयार करा. भाताला रंग येण्यासाठी फूड कलरचा वापर करा. अशाप्रकारे तयार होईल तिरंगा पुलाव.
बेसनच्या पीठाचा वापर करून ढोकळ्याचे तिरंग्यातील तीन रंगांप्रमाणे तीन बॅटर तयार करून घ्या. तिरंगा ढोकळ्याच्या रेसिपीसाठी तीन रंगांतील ढोकळा तयार झाल्यानंतर खाण्यासाठी सर्व्ह करा.