धनत्रयोदशीला करा मिठाचे सोपे उपाय, आर्थिक अडचणी दूर होण्यास मिळेल मदत
धनत्रयोदशीचा सण 10 नोव्हेंबरला आहे. जीवनातील पैशांचे अडथळे-अडचणी दूर करण्यासाठी या दिवशी काही खास उपाय केल्यास मोठी मदत मिळू शकते.
मीठ हे शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. हा ग्रह आपल्याला पैसा व सुख प्रदान करतो. म्हणूनच धनत्रयोदशीला मीठ विकत घ्या आणि त्याचे उपायही करा.
धनत्रयोदशीला मिठाचे कोणकोणते उपाय करावेत, जाणून घेऊया सविस्तर...
मिठाशी संबंधित काही खास उपाय केल्यास जीवनात सकारात्मक बदल होऊ शकातत. ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाला अतिशय महत्त्व आहे.
लक्ष्मीदेवी समुद्रकन्या असल्याने या दिवशी गृहिणींनी मीठ खरेदी करावे व काचेच्या वाटीत भरून घराच्या पूर्व दिशेला ठेवावे. वास्तूदोषासह हळूहळू पैशांच्या अडचणीही दूर होतील.
तुमच्या घरात नकारात्मकता अधिक असेल तर धनत्रयोदशीला पाण्यात थोडेसे मीठ मिक्स करून संपूर्ण घर स्वच्छ करावे. यामुळे सकारात्मकता वाढेल व लवकरच शुभ फळही मिळेल.
धनत्रयोदशीला खडे मीठ म्हणजे जाडे मीठे खरेदी करा व दिवाळीला ते पूजेच्या ठिकाणी ठेवून नंतर घरामध्ये ज्या जागी अंधार जास्त असतो, तेथे ठेवावे. यामुळे समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.
व्यवसाय वाढीसाठी धनत्रयोदशीला ऑफिस-दुकानात मिठाची पुडी ईशान्य दिशेला ठेवावी. पुडी कोणालाही दिसणार नाही, याची काळजी घ्या. यामुळे व्यापारात प्रगती होण्यास मदत मिळू शकते.
कर्जाचा डोंगर वाढला असेल तर धनत्रयोदशीला काचेच्या ग्लासात पाणी व मीठ मिक्स करून घराच्या दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात ठेवा. यामुळे तुमच्या समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.