धनत्रयोदशीच्या दिवशी घरी आणा या 5 गोष्टी, सुख,धन-समृद्धी होईल वाढ
धनत्रयोदशीच्या दिवशी काही खास गोष्टी घरात घेऊन आल्यास धन-समृद्धी आकर्षित होण्यास मदत मिळू शकते.
धन-समृद्धी आकर्षित करण्यासाठी कोणकोणते उपाय करावे, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीचे चांदीचे चरण चिन्ह घरात आणा व धनस्थान म्हणजे तिजोरी, लॉकरमध्ये ठेवा. यामुळे तुमच्यावर लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद कायम राहील.
यंत्र शास्त्रात श्री यंत्रास देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. धनत्रयोदशी दिवशी हे देखील आणून देव्हाऱ्यात ठेवा व रोज पूजा करावी. यामुळे पैशांची चणचण कधीही भासणार नाही.
धनत्रयोदशीला लक्ष्मीची पूजा करण्यासाठी पाऱ्यापासून तयार केलेली लक्ष्मीची प्रतिमा शुभ मानली जाते. पाऱ्याची लक्ष्मीची प्रतिमा घरातील सुख-संपत्तीत वाढ करून नकारात्मकता दूर करते.
शंखाला देवी लक्ष्मीचा भाऊ देखील म्हटले जाते. धनत्रयोदशीला दक्षिणावर्ती शंख आणून आपल्या किचनमध्ये ठेवा. यामुळे घरात अन्न व पैशांची कमतरता भासणार नाही.
धनत्रयोदशीला धनाची देवता कुबेराचीही पूजा केली जाते. धनत्रयोदशीला यांची प्रतिमा आणून घराच्या उत्तर दिशेला ठेवावी.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.