Lifestyle

SPIRITUAL

देवाचे नाव असलेले कपडे परिधान करावे की करू नये?

Image credits: Pinterest

देवाचे नाव लिहिलेल्या कपड्यांची फॅशन

हल्ली देवांच्या नावाचे प्रिंट असलेले कपडे परिधान करण्याचा ट्रेण्ड आहे. फॅशन म्हणून कपड्यांवर वेगवेगळ्या देवी-देवतांच्या नावाचे प्रिंट पाहायला मिळते.

Image credits: Pinterest

देवांचे नाव लिहिलेले कपडे परिधान करणे योग्य की अयोग्य?

काही लोक देवाच्या नावांचे प्रिंट असलेले कपडे परिधान करून धार्मिक स्थळांना भेट देतात. पण असे कपडे परिधान करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या प्रेमानंद महाराजांनी काय सांगितले...

Image credits: Pinterest

प्रेमानंद महाराजांचा व्हिडीओ व्हायरल

प्रेमानंद महाराज यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते राधा नाव लिहिलेले कपडे परिधान केलेल्या तरुणाला अशा प्रकारचे पोषाख परिधान न करण्याचा सल्ला देत आहेत.

Image credits: Pinterest

कळत-नकळत होतेय चूक

प्रेमानंद महाराज तरुणाला म्हणताहेत की, 'अशा प्रकारचे कपडे परिधान करून कळत-नकळत आपण आपल्याच देवांचा अपमान करत आहोत. असे करणं महापाप आहे, त्यामुळे ही चूक करणं टाळावे'.

Image credits: facebook

ही चूक करू नका

प्रेमानंद महाराजांनुसार, देवाचे नाव असलेले कपडे जेव्हा आपण जेथे धुतो, तेव्हा भगवंताचा अपमान होतो. कारण बाथरूम अस्वच्छ असते. तेथे अशा पद्धतीचे कपडे धुऊ नये.

Image credits: Pinterest

अशा पोशाखांचा ठेवा मान

प्रेमानंद महाराजांनुसार, दैनंदिन जीवनात आपण कळत-नकळत कित्येकदा अशुद्ध होतो, अशा स्थितीत देवाचे नाव असलेल्या पोशाखांचा मान ठेवणं शक्य होत नाही.

Image credits: facebook

देवांचे नाव असलेले कपडे परिधान करू नका

प्रेमानंद महाराजांच्या मते, देवाचे नाव लिहिलेले कपडे चुकूनही परिधान करू नये. असे करून आपण कळत-नकळत पापाचे भागीदार होत आहात, त्यामुळे अशी चूक करणे टाळावे.

Image credits: Pinterest

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Facebook