Diwali 2023 : राशीनुसार असे करा उपाय, महालक्ष्मीचा सदैव राहील आशीर्वाद
दिवाळीमध्ये आपण आपल्या राशीनुसार उपाय केल्यास तुमचे नशीब उजळू शकते. राशीनुसार कोणकोणते उपाय केल्यास लाभ मिळू शकतात, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
दिवाळीच्या रात्री फिकट केशरी रंगाचे कापड धनस्थानी म्हणजे तिजोरीमध्ये ठेवा. यामुळे धनाची कधीही कमतरता भासणार नाही व घरातही सुख-समृद्धी नांदेल.
दिवाळीच्या रात्री कमळ फुलाची पूजा करा व ते लाल कापडामध्ये बांधून आपल्या धनस्थानी ठेवा. यामुळे महालक्ष्मीचा तुमच्यावर कायम आशीर्वाद राहील.
लक्ष्मीपूजनादरम्यान दक्षिणावर्ती शंखाचीही पूजा करा व आपल्या पूजस्थानी ते स्थापित करा. नियमित याची पूजा करावी. यामुळे धनलाभ होऊ शकतो.
दिवाळीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावा व लक्ष्मी मातेला आपल्या घरात प्रवेश करण्यास निमंत्रण द्यावे. यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीमातेचे कायमचे निवास होईल.
दिवाळीच्या रात्री 12 वाजता घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना शुद्ध तुपाचा दिवा लावा. यामुळे धनलाभासह तुमच्या मानसन्मानातही वाढ होईल.
दिवाळीमध्ये कमळगट्ट्याची माळ लक्ष्मीमातेला अर्पण करा. रात्री 12 वाजता या माळेनं लक्ष्मी मंत्राचा जप करावा. यामुळे तुमच्या समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.
कुंकू-तूप एकत्रित करून वडाच्या पानांवर ‘ऊँ श्रीं श्रियै नमः’ हा मंत्र लिहा व ही पाने लक्ष्मीदेवीला अर्पित करा. यामुळे तुमच्या मनातील मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळेल.
दिवाळीच्या दिवशी घराच्या आसपास असणाऱ्या बागेत केळ्याचे झाड लावा व रोज त्याची निगा राखा. लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी हा अचूक उपाय आहे.
दिवाळीत विड्याच्या पानावर केशरी गंधाने 'श्री' लिहून त्याची पूजा करा. यानंतर एका नदीमध्ये हे पान सोडून द्यावे.
दिवाळीच्या रात्री 12 वाजता घराच्या उत्तर-पूर्व दिशेमध्ये शुद्ध तुपाचे दोन दिवे लावा. यामुळे अडकलेला पैसा मिळवण्याची शक्यता वाढते.
लक्ष्मीदेवीला गाईच्या दुधापासून तयार केलेल्या खिरीचा नैवेद्य दाखवा. यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी नांदेल व धनलाभही होईल.
दिवाळीत लक्ष्मी देवीच्या मंदिरात जाऊन कमळाचे फुल, नारळ, पान, फळ इत्यादी गोष्टी अर्पण करा. यामुळे आर्थिक समस्या संपुष्टात येईल.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.