आसनांचा सराव करताना कधीही करू नका या चुका, होतील गंभीर परिणाम
योगासनांचा सराव करताना काही लोक कळत नकळत काही चुका करतात. यामुळे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती...
काहीजण आपल्या वेळेनुसार कमी-जास्त कालावधीत योगासनांचा सराव करतात. यामुळे शारीरिक समस्या वाढण्याची शक्यता आहे. हे नुकसान टाळण्यासाठी सरावाचा कालावधी निश्चित करावा.
योगासनांचा सराव करताना कधीही श्वासोच्छवासाची प्रक्रिया रोखून धरू नये. मुखावाटे श्वास घेणे टाळावे.
आसनांचा सराव करताना कधीही हलके व सैल कपडे परिधान करावेत. यामुळे सरावात अडथळे निर्माण होत नाहीत.
एखादी शारीरिक दुखापत झाली असल्यास किंवा आजारपणामध्ये आसनांचा सराव करणे टाळावे. यामुळे शारीरिक समस्या अधिक वाढण्याची शक्यता असते.
आसनांचा सराव करताना मोबाइलचा वापर करणं टाळा. कारण यामुळे एकाग्रतेवर परिणाम होतात.
आसनांची अंतिम स्थिती आपल्या क्षमतेनुसार धारण करावी. जबरदस्तीने कोणतेही आसन करणं टाळावे. कारण यामुळे शरीरास कोणतेही फायदे मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या.
आसनांचा सराव तज्ज्ञांच्या देखरेखी अंतर्गतच करावा. असे न केल्यास शारीरिक दुखापत होण्याची शक्यता असते.
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.