Marathi

RELATIONSHIP TIPS

BREAKUPनंतर दुखावलेले मन सावरण्यासाठी कामी येतील या 8 गोष्टी

Marathi

सत्य स्वीकारा

ज्या व्यक्तीवर तुमचे जीवापाड प्रेम होते, आता ती तुमच्या आयुष्यात नाही;हे सत्य स्वीकारा आणि करिअरवर लक्ष केंद्रीत करा.

Image credits: Our own
Marathi

भावना व्यक्त करा

ब्रेकअपमुळे मानसिक त्रास होणे साहजिक आहे. त्यामुळे रडू येते, राग अनावर होतो व नैराश्यही येऊ शकते. या सर्व भावनांचा सामना करा. व्यक्त व्हा.

Image credits: Getty
Marathi

कायमचे अंतर निर्माण करा

फोन, सोशल मीडिया प्लॅटफॉमवरही आपल्या एक्सपासून दूर राहा. त्याचे प्रोफाइल तपासू नका. कठीण आहे पण जमल्यास मोबाइल नंबर डिलिट करा.

Image credits: Getty
Marathi

आभार माना

आयुष्यात पॉझिटिव्ह राहणे खूप गरजेचं आहे. जे काही घडले त्याबद्दल आभार माना. ते म्हणतात ‘ना जीवनात जे काही घडते, ते चांगल्यासाठीच घडते’.

Image credits: Our own
Marathi

आठवणींना उजळा देणे टाळा

लोकांसमोर वारंवार आपले दुःख व्यक्त करणे टाळा. आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणीकडे भावना व्यक्त करा व मन मोकळे करून रडा. यानंतर पुन्हा कधीही ब्रेकअपचा उल्लेख करू नका.

Image credits: Getty
Marathi

मित्रमैत्रिणींना भेटा

प्रियकर-प्रेयसीची आठवण येऊ नये, यासाठी मित्रमैत्रिणी व नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. नवीन माणसांना भेटा.

Image credits: Getty
Marathi

कामात मन गुंतवा

विद्यार्थ्यांनी अभ्यासात तर काम करणाऱ्यांनी आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करावे. करिअर घडवण्यासाठी मेहनत घ्या.

Image credits: Getty
Marathi

आरोग्य घ्या काळजी

ब्रेकअपनंतर काही जणांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. पण मंडळींनो असे करू नका. शारीरिक व मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा व पौष्टिक आहाराचे सेवन करा.

Image Credits: Getty