कच्च्या दूधाची चहा पिता? उद्भवतील आरोग्यासंबंधित समस्या
Lifestyle Nov 05 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Freepik
Marathi
कच्च्या दूधामुळे होणारे नुकसान
आरोग्य सुदृढ राहण्यासाठी दूधाचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. दूधात कॅल्शिअम असल्याने हाडांना बळकटी मिळते. पण कच्च्या दूधाचे सेवन चहासोबत करणे टाळा.
Image credits: Freepik
Marathi
आजारांचा धोका
कच्चे दूध प्यायल्याने आरोग्यासंबंधित समस्या उद्भवल्या जाऊ शकतात. कच्च्या दूधात किटाणू किंवा बॅक्टेरिया असल्याने डायरिया, डिहाइड्रेशन अशा आजारांचा सामना करावा लागू शकतो.
Image credits: Freepik
Marathi
गर्भवती महिलांसाठी नुकसानदायक
कच्चे दूध गर्भवती महिलांसाठी नुकसानदायक ठरू शकते. यामुळे लिस्टेरियोसिस नावाचे इंन्फेक्शन होऊ शकते. याचा बाळाला आणि आईला त्रास होऊ शकतो.
Image credits: Freepik
Marathi
बर्ड फ्लू चा धोका
कच्च्या दूधामध्ये आरोग्याला नुकसान पोहोचवणारे किटाणू असतात. त्यापैकी एक म्हणजे HPAI(H5N1) यामुळे बर्ड फ्लू चा धोका उद्भवला जाऊ शकतो.
Image credits: Freepik
Marathi
अॅसिडचा स्तर वाढला जातो
कच्च्या दूधामुळे शरिरातील अॅसिडचा स्तर वाढला जाऊ शकतो. यामुळे पोटासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
Image credits: FREEPIK
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.