250 ग्रॅम रताळी, शेंगदाण्याचा कूट, ओलं खोबर, हिरवी मिरची, आले, कोथिंबीर, जीरे, साखर, तेल आणि चवीनुसार मीठ
सर्वप्रथम रताळे स्वच्छ धुवून उकडून घ्या. उकडलेल्या रताळ्यांची साल काढून त्याचे बारीक काप करत एका प्लेटमध्ये ठेवा.
कढईमध्ये तूप घालून जीरे, मिरचीची फोडणी द्या. यामध्ये कोथिंबीरही घाला.
फोडणीमध्ये रताळ्याचे काप मिक्स करुन कढईवर झाकण ठेवून एक वाफ काढा.
कढईवरील झाकण काढल्यावर त्यामध्ये मीठ, साखर आणि शेंगदाण्याचा कूट घालून सर्व सामग्री व्यवस्थितीत मिक्स करा.
रताळ्याच्या भाजी शिजल्यावर त्यावरुन ओलं खोबर आणि कोथिंबीर घालून खाण्यासाठी प्लेटमध्ये सर्व्ह करा.
चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी करा या 5 गोष्टी, आठवड्याभरात दिसेल फरक
Independence Day 2024 निमित्त या 7 ठिकाणांना नक्की भेट द्या
उपाशीपोटी खा लसणाच्या 2 पाकळ्या, रहाल आजारांपासून दूर
Shravan Recipe : नारळी पौर्णिमा होईल खास, पाहा सोपा नारळी भात