भारतात प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण स्वातंत्र्याचा आनंद लुटण्यासह मातृभूमीसाठी प्राणाची आहुती दिलेल्या शूरवीरांना सलाम केला जातो.
15 ऑगस्टला तुम्ही दिल्लीतील इंडिया गेटला फिरायला जाऊ शकता. हे ठिकाण भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ तयार करण्यात आले होते.
दिल्लीतील लाल किल्ल्याला 15 ऑगस्टच्या दिवशी भेट देऊ शकता. येथे प्रत्येक स्वातंत्र्य दिनावेळी पंतप्रधानांकडून भारताचा झेंडा फडकवला जातो.
झाशीचा किल्ला पाहण्यासाठी दूरदूरवरुन पर्यटक येतात. किल्ला बागरी नावाचा पहाडाच्या टोकावर आहे. या किल्ल्याचे बांधकाम 17 व्या शतकात झाले होते.
जैसलमेर किल्ला राजस्थानमधील दुसरा सर्वाधिक जुना किल्ला आहे. अशातच किल्ल्याचे सौंदर्य पहायचे असल्यास नक्कीच स्वातंत्र्य दिनावेळी जाऊ शकता.
जलियनवाला बाग हत्याकांडात अनेकजण शहीद झाले होते. त्यांच्याच आठवणीत जलियनबाला बागला स्वातंत्र्य दिनानिमित्त भेट देऊ शकता.
स्वातंत्र्य दिनानिमित्त आगरा किल्ल्यावर परिवारासोबत फिरायला जाऊ शकता. येथे 15 ऑगस्टला काही परेडचे आयोजन केले जाते.
जोधपूरमध्ये असलेल्या मेहरानढ किल्ल्या भेट देऊ शकता. किल्ल्याची वास्तुकला आणि सौंदर्य पाहून त्याच्या प्रेमात पडाल.