कुबेर टीलाचे हे आहे महत्त्व, जेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पूजा
Lifestyle Jan 22 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
रामललांची प्राणप्रतिष्ठा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येतील रामललांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळा पार पडला. यानंतर पंतप्रधान कुबेर टीला येथे जाऊन पूजा करणार आहेत.
Image credits: Our own
Marathi
प्राचीन स्थळ
राम मंदिराच्या आसपास काही प्राचीन देवस्थान आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहितेय. कुबेर टीला यापैकीच एक आहे. येथे भगवान शंकराचे एक प्राचीन मंदिरही आहे.
Image credits: wikipedia
Marathi
धार्मिक महत्त्व
राम मंदिराच्या दक्षिण दिशेला कुबेर टीला आहे. हे स्थान पुरातत्व विभागाअंतर्गत येते. या स्थानाचे धार्मिक महत्त्व आहे. याशिवाय कुबेर टीलाचा जीर्णोद्धारही करण्यात आला आहे.
Image credits: X-DD News
Marathi
कुबेर देवांनी केली होती तपस्या
धार्मिक मान्यतनेनुसार, धनाची देवता मानल्या जाणाऱ्या कुबेर देवतांनी या ठिकाणी तपस्या केली होती. यामुळेच या ठिकाणाला ‘कुबेर टीला’ असे नाव पडले आहे.
Image credits: adobe stock
Marathi
जटायूंच्या मूर्तीची स्थापना
कुबेर टीलाचा जीर्णोद्धार करताना येथे 8 मीटर रुंद पंख असणाऱ्या जटायूंची मूर्तीही स्थापन करण्यात आली आहे.
Image credits: Social Media
Marathi
कुबेर टीलाचे महत्त्व
कुबेल टीला येथे कुबेरेश्वर महादेवांचे मंदिर आहे. कुबेर टीलाचे खोदकाम केल्यानंतर येथे जटायू, तलवार गणेश व बाल हनुमानाची मूर्ती सापडली होती.