येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्त कमी खर्चात घराची सजावट कशी करायची याबद्दलच्या काही आयडिया पाहूया पुढे…
रक्षाबंधनावेळी भावाला ओवाळणी करण्यासाठी खास तयारी करू शकता. यावेळी रंगीत पडद्यांचा वापर करुन त्यावर फुलांच्या माळा अथवा वॉल हँगिगचा वापर करुन घराला सजवू शकता.
सणाचा उत्साह वाढवण्यासाठी घराला रंगीत फुलं, कुशन कव्हर, चादर अशा काही गोष्टींचा वापर करू शकता. यावेळी घराला अधिक डेकोरेटिव्ह लूक देण्यासाठी गडद रंगांचा वापर करू शकता.
घराला एथनिक लूक देण्यासाठी त्यानुसार कुशन कव्हर, चादर अथवा टेबलावर ठेवल्या जाणाऱ्या गोष्टींचा वापर करू शकता. सिंपल आणि सोबर लूकही घराची शोभा वाढवतो.
रक्षाबंधनवेळी एखादे नवे शो पीस खरेदी करू शकता. अशाप्रकारचे शो पीस तुम्हाला ऑनलाइन किंवा मार्केटमध्ये 2 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.
रक्षाबंधनावेळी सणाचा घराला लूक देण्यासाठी दिव्यांची सजावट करू शकता. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणि आकारचे दिवे तुम्हाला खरेदी करता येतील.
रांगोळीशिवाय सणाचा उत्साह अपूर्ण आहे. यामुळे रक्षाबंधनावेळी घराच्या एखाद्या कोपऱ्यात अथवा घराबाहेर सुंदर अशी रांगोळी काढू शकता.
फुलांची सजावट प्रत्येक सणाला केली जाते. पण रक्षाबंधनावेळी देखील खास फुलांची सजावट करत घराची शोभा वाढवू शकता. यावेळी फुलांची रांगोळी काढण्यासह माळा घराच्या दरवाज्यावर लावू शकता.