Marathi

Independence Day 2024 : तिरंग्यासंबंधित हे 6 नियम ठेवा लक्षात

Marathi

हर घर तिरंगा

15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त सरकारकडून हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. यानुसार भारतीयाला घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन केले जातेय.

Image credits: adobe stock
Marathi

राष्ट्रीय ध्वजासंबंधित कायदे

राष्ट्रीय ध्वज फडकवण्यासंर्भात काही कायदे आणि नियम आहेत. या नियमांचे प्रत्येक भारतीयाने पालन करणे अनिवार्य आहे.

Image credits: Getty
Marathi

राष्ट्रध्वजाचा आकार

भारतीय ध्वज संहितेनुसार, राष्ट्रीय ध्वजाचा आकार आयताकार असावा. ध्वजाची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 3:2 अशी असावी.

Image credits: Getty
Marathi

तिरंग्याचा सन्मान

ज्यावेळी तिरंगा फडकवला जातो तेव्हा त्याला पूर्ण सन्मान देणे अनिवार्य आहे. याशिवाय तिरंगा दिसेल अशा उंचीवरुन फडकवावा.

Image credits: Getty
Marathi

तिरंगा फाटलेला नसावा

राष्ट्रीय ध्वज फडकवताना तिरंगा फाटलेला अथवा चुरगळलेला नसावा. याशिवाय तिरंगा जमिनीवर फेकून देण्यासही परवानगी नाही.

Image credits: Getty
Marathi

उलटा ध्वज फडकवू नये

राष्ट्रीय ध्वज कधीच उलटा फडकवू नये. म्हणजेच केशरी रंगाची बाजू खालच्या बाजूस नसावी.

Image credits: Getty
Marathi

नियम मोडल्यास होईल शिक्षा

राष्ट्रीय ध्वजाचा अपमान करण्यासह उलटा, फाटलेला अथवा मळलेला फडकवल्यास तीन वर्षांचा तुरुंगवास अथवा दंडात्मक कारवाई केली जाऊ शकता. अथाव दोन्ही शिक्षा हऊ शकतात.

Image credits: Getty

Raksha Bandhan 2024 : भावाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त घ्या जाणून

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दलच्या 10 खास गोष्टी

Independence Day 2024 साठी पांढऱ्या रंगातील 8 सलवार सूट डिझाइन

Raksha Bandhan 2024 साठी हटके आणि ट्रेण्डी राखी डिझाइन, भाऊ होईल खूश