साईड पार्टेड प्लिट्स हेअर स्टाईल करण्यासाठी अत्यंत सोपी आहे. आधी व्यवस्थित केसातील गुंता काढून पार्टीशन करून मग अश्या साईड प्लिट्स टाकू शकतात.
लग्नाच्या सीझनमध्ये काहीतरी अनोखं ट्राय करायचं असेल, तर हाय पफ हेअरस्टाईलसह मोकळ्या केसांची ट्राय करू शकता. अर्धे केस पफमध्ये बनवा आणि बाकीचे अर्धे हलके कर्लने उघडे सोडा.
समोरच्या अर्ध्या केसांमध्ये हलके कर्ल करून आणि मागील बाजूस बन बनवून ही हेअर स्टाईल ट्राय करू शकता.या हेअर स्टाईलमध्ये सेंटर बन तयार करण्यात येतो.
जर तुमचे केस तुमच्या मानेपर्यंत असतील तर तुम्ही ही साधी आणि गोंडस हेअरस्टाईल करून पाहू शकता. आजकाल, अशा हेअर स्टाईल वेस्टर्न ते एथनिक पोशाखांसह छान दिसतात.
जर तुम्ही एथनिक पोशाख घालून पार्टीला जात असाल, तर ही हाय मेसी बन हेअरस्टाइल त्यासाठी योग्य आहे. ही हेअर स्टाईल तुमच्या प्रत्येक पोशाखासोबत चांगली दिसेल आणि बनवायलाही खूप सोपी आहे.
तुम्हाला हेअर स्टाईल करायला वेळ मिळाला नाही तर तुम्ही हि हेअर स्टाईल ट्राय करू शकता. ड्रायरच्या माध्यमातून केसांमध्ये असा वेवीनेस तयार करून ही हेअर स्टाईल तयार करण्यात येते
उन्हाळ्यात केसांना सुंदर लुक देण्यासाठी पोनीटेल हेअरस्टाइल हा एक चांगला मार्ग आहे. हे 5 मिनिटांत बनवता येते. तसेच, गोंधळलेल्या लूकसह ते खूपच स्टाइलिश दिसते.
ही हेअर स्टाईल करण्यासाठी, केसांना व्यवस्थित कोंब करा आणि सीरम लावा.आता स्लीक एथनिक बन बनवून ही हेअर स्टाईल तयार होईल.या स्टाईलसाठी हेअर ॲक्सेसरीज देशील वापरू शकता