चमकार आणि तजेलदार त्वचेसाठी सोपा उपाय, वापरा या फुलाचे पाणी
Lifestyle Apr 22 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Freepik
Marathi
चेहऱ्याचे सौंदर्य वाढवेल हे फूल
चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक फुलांचा वापर केला जातो. पण असे एक फूल ज्याच्या केवळ पाण्याचा वापर केल्यास चेहऱ्याची त्वचा चमकदार आणि तजेलदार होऊ शकते.
Image credits: Freepik
Marathi
जास्वंदीचे फूल
जास्वंदाच्या फुलांचा वापर डेली स्किन केअर रुटीनमध्ये केल्यास चेहऱ्याची त्वचा चमकदार आणि तजेलदार होण्यास मदत होईल.
Image credits: Freepik
Marathi
कसा कराल वापर?
जास्वंदाच्या फुलांपासून घरच्याघरी तुम्ही टोनर तयार करू शकता.
Image credits: Freepik
Marathi
असे तयार करा टोनर
सर्वप्रथम जास्वंदाची फुलं पाण्यात उकळवून घ्या. पाणी थंड झाल्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये जास्वंदाच्या फुलांचे पाणी भरून ठेवा. अशाप्रकारे टोनर तयार होईल.
Image credits: Freepik
Marathi
फेस पॅक
जास्वंदाच्या फुलांपासून फेस पॅकही तयार करू शकता. यासाठी जास्वंदाची फुलं वाटून घेत त्यामध्ये दही अथवा मध मिक्स करून एक पेस्ट तयार करा.
Image credits: social media
Marathi
चमकदार आणि तजेलदार होईल त्वचा
जास्वंदाच्या फुलांचा वापर करून चेहऱ्याची त्वचा चमकदार आण तजेलदार होण्यास मदत होईल. केवळ 14 दिवसात तुम्हाला चेहऱ्याच्या त्वचेमध्ये बदल झालेलाही दिसेल.
Image credits: Freepik
Marathi
पिंपल्स आणि डागांची समस्या कमी होते
अँक्टी-ऑक्सिटेंड्स गुणधर्मामुळे जास्वंदाच्या फुलांचा वापर करून चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डागांच्या समस्येपासून दूर राहू शकता.
Image credits: Freepik
Marathi
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात
जास्वंदाच्या फुलांमध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म असतात. जास्वंदाच्या फुलांचे पाणी वापरल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होण्यास मदत होईल.
Image credits: Freepik
Marathi
Disclaimer :
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.