भारतीय महिलांना साडी नेसणे फार आवडते. अशातच बनारसी साडी परफेक्ट कशी नेसावी याबद्दच्या काही टिप्स जाणून घेऊया...
बनारसी साडी नेसण्याआधी व्यवस्थितीत इस्री करा. जेणेकरून साडीच्या निऱ्या व्यवस्थित येतील.
बनारसी साडी नेसण्यासाठी सर्वप्रथम परकरच्या आजूबाजूने साडी व्यवस्थितीत खोचून घ्या. यानंतर निऱ्या काढा. निऱ्यांना पिन लावून हाताने व्यवस्थितीत सेट करा.
साडीच्या निऱ्या काढल्यानंतर पदर व्यवस्थितीत काढत पिन लावून घ्या. जेणेकरून सातत्याने खाली पडणार नाही.
साडीमध्ये स्लिम आणि सुंदर दिसण्यासाठी योग्य परकरची निवड करा. बनारसी साडी नेसणार असल्यास शेपवेअर खरेदी करा.
बनारसी साडीवर हेव्ही ज्वेलरी अजिबात घालू नका. यावर हलकी ज्वेलरी सुंदर दिसते.
बनारसी साडी नेसल्यानंतर ती सांभळणे काही महिलांसाठी कठीण होऊ शकते. यामुळे वजनाने हलकी असणारी बनारसी साडी खरेदी करू शकता.
बनारसी साडी खरेदी करताना त्याची बॉर्डर हेव्ही नसू द्या. पातळ बॉर्डर असणाऱ्या साडीत लुक अधिक खुलला जातो.