पुण्यात अनेक मंदिरे, वाडा आणि टेकडी अशी काही ठिकाणे फिरण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण काही ठिकाणांबद्दल अनेकांना माहिती नाही. याबद्दलच जाणून घेऊया पुढे…
पुण्यातल्या जवळजवळ मध्यवर्ती ठिकाणी तळजई टेकडी आणि त्यावर असलेले छोटेसे जंगल आहे. तिन्ही ऋतूत नयनरम्य. यासोबत इथे मोर आहेत. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी नागरिकांची येथे गर्दी होते.
कासारसाई धरणाबद्दल कित्येक पुणेकरांना हे ठिकाण माहीतही नसेल. पण हिंजवडी पासून हाकेच्या अंतरावर असलेले हे धरण अतिशय सुंदर, कमी गर्दी असलेले आहे.
दुर्गा टेकडी हे सुद्धा पुण्यात काहीसे माहिती नसलेले परंतु सुंदर ठिकाण आहे.
देहूरोड येथे टेकडीवर अय्यप्पा मंदिर हे एक मल्याळम पद्धतीचे सुंदर मंदिर आहे. इथली धाटणी अतिशय वेगळी आहे.
पुण्यात ट्रेकिंग करण्यासाठी बरेच किल्ले आणि ट्रेकिंग पॉईंट आहेत जिथे तुम्ही भेट देऊ शकता.