लहान मुलांना स्नॅक टाइमवेळी घरीच पॉपकॉर्न तयार करुन देऊ शकता. यासाठी लागणारी सामग्री आणि कृती सविस्तर पुढे पाहूया.
एक वाटीभर मक्याचे दाणे, 2-3 टिस्पून तेल, 2 टिस्पून बटर, 1 टिस्पून हळद, 1 टिस्पून लाल तिखट, 1 टिस्पून ऑरिगॅनो आणि चवीनुसार मीठ.
सर्वप्रथम गॅसवर कुकर गरम करत ठेवा. यामध्ये तेल घातल्यानंतर मक्याचे दाणे घाला.
मक्याचे दाणे सतत हलवत रहा. जेणेकरुन कुकरला चिकटले जाणार नाहीत. यावेळी दाण्यांचा रंगही बदलला जाईल
तेलातील मक्यांच्या दाण्यांमध्ये हळद, तिखट, मीठ, बटर, ऑरिगॅनो घालून सर्व सामग्री व्यवस्थितीत मिक्स करा.
सामग्री मिक्स केल्यानंतर कुकरवर त्याचे झाकण 2-3 मिनिटांसाठी उलटे ठेवा. अशाप्रकारे झटपट घरच्याघरीच पॉपकॉर्न तयार होतील.
कुकरमधील पॉपकॉर्न काढून मुलांना स्नॅक टाइमवेळी खाण्यास सर्व्ह करा.