1 कप तांदळाचे पीठ, ओले खोबरे, दीड कप गूळ, तूप, वेलची पावडर, हळदीची पाने आणि चवीनुसार मीठ
सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये पाणी गरम करा. गरम पाण्यात एक चमचा तूप, मीठ घातल्यानंतर तांदळाचे पीठ घाला. आता तांदळाचे पीठ घट्ट मळून घ्या.
कढईत दोन चमचे तूप घातल्यानंतर किसलेले खोबरे, गूळ, वेलची पावडर टाकून सारण तयार करा.
हळदीची पाने स्वच्छ धुवून आणि पुसून घ्या.
पातोळ्यांसाठी तयार केलेले तांदळाचे पीठ हळदीच्या पानांवर लावून त्यामध्ये सारण भरा. आता हळदीचे पान दुसऱ्या बाजूने बंद करा.
भांड्यात गरम पाणी केल्यानंतर त्यावर ठेवलेल्या जाळीवर पातोळ्या वाफवण्यासाठी ठेवा. हळदीच्या पानांना सुंगध येऊ लागल्यानंतर गॅस बंद करा.
गरमागरम पातोळ्यांवर तूपाची धार सोडत खाण्यासाठी सर्व्ह करा.