सकाळचा हेल्दी नाश्ता करण्यासाठी तुम्ही पालक इडली तयार करू शकता. याचीच संपूर्ण रेसिपी पाहूयात पुढे...
पालक इडली झटपट तयार करण्यासाठी पालकशिवाय गाजर, बीन्स आणि दह्याचा वापर करू शकता. ही इडली लहान मुलांना डब्यातही देऊ शकता.
1 कप रवा, पालक,अर्धी वाटी किसलेला गाजर, 4 चमचे दही, चणे-उडदाची डाळ, आलं, हिरवी मिरची, जीर, बेकिंग सोडा, तूप आणि चवीनुसार मीठ.
सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून बारीक वाटून घ्या. आता पॅनमध्ये तूप टाकून राई, उडदाची डाळ, चणा डाळ भाजून घ्या. यामध्ये किसलेला गाजर आणि सर्व सामग्री 2 मिनिटांसाठी भाजून घ्या.
रवा मिक्सरमध्ये वाटून घेतल्यानंतर 2 मिनिटे भाजून घ्या. एका भांड्यात दही घेऊन त्यामध्ये रवा आणि पालक पेस्टसह अन्य सामग्री मिक्स करा.
इडली वाफवण्यासाठी इडलीचे भांडे गरम करा. यामध्ये इडलीचे बॅटर टाकून 15 मिनिटे शिजण्यासाठी ठेवा.
इडली व्यवस्थितीत वाफवून घेतल्यानंतर एक प्लेटमध्ये खोबऱ्याच्या अथवा टोमॅटोच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.