पार्टीसाठी Neha Pendse सारखा लुक हवाय? 5K पर्यंत येतील हे ड्रेस
Lifestyle Apr 21 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Insta
Marathi
हाय थाय स्लिट कट
अभिनेत्री नेहा पेंडसेसारखा हाय थाय स्लिट कट ड्रेस तुम्ही एखाद्या पार्टीवेळी परिधान करू शकता. या ड्रेसवर डायमंड ज्वेलरी शोभून दिसेल.
Image credits: Insta
Marathi
बॉडी हग ड्रेस
बॉडी हग ड्रेसचा सध्या ट्रेण्ड आहे. एखाद्या कॉकटेल किंवा नाइट पार्टीवेळी नेहा पेंडसेसारखा लाल रंगातील बॉडी हग ड्रेस परिधान करू शकता. यावर कानात गोल्डन रंगातील लॉन्ग ज्वेलरी घाला.
Image credits: Insta
Marathi
एथनिक फ्युजन ड्रेस
नेहा पेंडसेसारखा एथनिक फ्युजन ड्रेस पार्टीसाठी परिधान करू शकता. घरातील एखादी पार्टी किंवा छोटोखानी समारंभासाठी असा ड्रेस परफेक्ट आहे.
Image credits: Insta
Marathi
सॅटिन ड्रेस
सॅटिन कापडाच्या कोणत्याही ड्रेसमध्ये रॉयल लुक येतो. नेहासारखा पांढऱ्या रंगातील सॅटिन ड्रेस नाइट पार्टीसाठी बेस्ट पर्याय आहे. या ड्रेसवर कॉन्ट्रास्ट रंगातील ज्वेलरी छान दिसेल.
Image credits: Insta
Marathi
रेट्रो लुक ड्रेस
ऑफिसमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी रेट्रो लुकची थीम असल्यास नेहासारखा लाइट पिंक रंगातील ड्रेस परिधान करू शकता. असा ड्रेस मार्केटमध्ये पाच हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.
Image credits: Insta
Marathi
ब्लेझर विद टान्सपेरेंट पॅन्ट लुक
नेहा पेंडसेसारखा पांढऱ्या रंगातील ब्लेझर विद ट्रान्सपेरेंट पॅन्टचा लुक पार्टीवेळी रिक्रिएट करू शकता. या ड्रेसवर न्यूड मेकअप शोभून दिसेल.
Image credits: Insta
Marathi
शिमर ड्रेस
हॉट आणि बोल्ड लुकसाठी तुम्ही नेहा पेंडसेसारखा निळ्या रंगातील ड्रेस परिधान करू शकता. नेहा या ड्रेसमध्ये सेक्सी दिसतेय.