नयनतारासारखी भगव्या रंगातील कॉटन साडीवर हिरव्या रंगातील ब्लाऊज परिधान करू शकता. साडीवर कॉन्स्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज शोभून दिसते.
बनारसी साडी नेसणे प्रत्येक महिलेला पसंत असते. हनुमान जयंतीवेळी भगव्या रंगातील हेव्ही वर्क केलेली बनारसी साडी नेसू शकता. ब्लाऊजलाही हेव्ही वर्क असू द्या.
सारा अलीखानसारखी बांदणी प्रिंट असणाऱ्या भगव्या रंगातील साडीवर गुलाबी रंगातील कॉन्स्ट्रास्ट ब्लाऊज परिधान करू शकता.
फ्रिल साडीवर तुम्ही स्लिव्हलेस थ्रेड वर्क केलेले ब्लाऊज परिधान करू शकता. सध्या फ्रिल साडीचा ट्रेण्ड आहे.
भगव्या रंगातील प्लेन साडीवर काळ्या रंगातील ब्लाऊज परिधान करू शकता. या लुक खुलला जाईल. याशिवाय साडीवर मोत्याची ज्वेलरी सुंदर दिसेल.
विद्या बालनसारख्या भगव्या रंगातील साडीवर जांभळ्या रंगातील ब्लाऊज परिधान करू शकता.
निळ्या रंगातील पैठणी साडीवर भगव्या रंगाती ब्लाऊज परिधान करू शकता. या साडीमुळे ट्रेडिशनल लुक येईल.
मोनालिसासारखी तुम्ही सॅटिन आणि नेटच्या साडीवर व्हेलवेटचे स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान करू शकता.
हनुमान जयंतीला पूजेवेळी तुम्ही नारंगी रंगातील प्रिंट असणारी साडी नेसू शकता. यावर सिल्व्हर रंगातील बॉर्डर दिली आहे.