महावीर स्वामी जैन धर्मातील 24वे तीर्थंकर होते. प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीच्या तिथीला महावीर जयंती साजरी केली जाते.
पंचांगानुसार, यंदा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीची तिथी 21 एप्रिलला आहे. याच दिवशी महावीर जयंती साजरी केली जाणार आहे.
भगवान श्रीआदिनाथ यांच्या परंपरेत अनेक तीर्थंकर झाले. त्यापैकीच 24 वे तीर्थंकर महावीर स्वामी होते. महावीर स्वामींनी जगाला जगा आणि जगू द्या असा संदेश दिला.
महावीर स्वामींचा जन्म क्षत्रिय कुळात झाला होता. त्यांचे बालपणीचे नाव वर्धमान होते. ते लिच्छवी कुळातील राजा सिद्धार्थ व राणी त्रिशला यांचे पुत्र होते.
महावीर स्वामींनी तपस्या करून इंद्रियांवर विजय मिळवला होता. यामुळेच त्यांना महावीर उपाधि दिली गेली.
महावीर जयंतीनिमित्त जैन मंदिरांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. प्रभात फेरी काढली जाते. जैन संत प्रवचनांच्या माध्यमातून महावीर स्वामींबद्दलच्या काही गोष्टी सांगतात.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.