ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केमिकलयुक्त ब्लीचिंग केल्याने अनेकदा त्वचेचे नुकसान होऊ शकते. यामुळे त्वचेत कोरडेपणा, रॅशेस आणि जळजळ अशा समस्या उद्भवू शकतात.
जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने चेहऱ्याचा रंग उजळवायचा असेल तर नैसर्गिक गोष्टींपासून बनवलेला ब्लीच हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
टोमॅटोचा रस त्वचेवरील काळेपणा आणि टॅनिंग दूर करण्यास मदत करतो. यासाठी १ टोमॅटोच्या रसात १ चमचा लिंबूचा रस मिसळा. चेहऱ्यावर १५ मिनिटे लावा. कोमट पाण्याने धुवा.
बेसन टॅनिंग आणि मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. २ चमचे दह्यात १ चमचा बेसन मिसळून चेहऱ्यावर लावा, २० मिनिटे सुकू द्या. हलक्या हातांनी स्क्रब करत धुवा.
पपईपासून नैसर्गिक ब्लीच बनवण्यासाठी अर्धा कप पिकलेला पपई चोळून घ्या. त्यात १ चमचा मध मिसळा, १५-२० मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा.