अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी चोंडी गावात झाला होता.
अहिल्याबाई कधीच शाळेत गेल्या नाहीत. पण वडिलांनी अहिल्याबाईंना लिहायला आणि वाचायला शिकवले.
वर्ष 1733 मध्ये वयाच्या 8व्या वर्षी अहिल्याबाईंचा विवाह मल्हारराव खांडेकर यांचा मुलगा खंडेराव होळकर यांच्यासोबत झाला.
वर्ष 1745 मध्ये अहिल्याबाईनी मालेराव होळकर यांना जन्म दिला. पण कुंभारच्या लढाईत पती खंडेराव होळकर यांचा मृत्यू झाला. यामुळे वयाच्या 21 व्या वर्षी विधवा झाल्या.
मुलगा मालेरावच्या निधनानंतर अहिल्याबाईंनी तत्कालीन पेशवे कोमालवाचा कारभार हाती घेण्याची परवानगी मागितली होती. परवानगीनंतर अहिल्याबाई माळव्याच्या अधिपती झाल्या.
माळव्याची राणी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या अहिल्याबाई एक शूर योद्धा, प्रभावशाली शासक आणि कुशल राजकरणी होत्या.
मराठा सम्राज्यातील अतिशय दानशूर, कर्तृत्वान आणि कुशल प्रशासक अशा त्या लोकनेत्या होत्या.
अहिल्याबाईंनी इंदूरमध्येच नव्हे देशभरात अनेक महत्वपूर्ण विकास कामे केली. धरणे, घाट, टाक्या, तलाव बांधून आवश्यक आरोग्य सुविधाही उपलब्ध करुन दिल्या.
हरिद्वार, काशी, विश्वनाथ, अयोध्या, कांची, द्वारका, बद्रीनाथ अशा धार्मिक स्थळांची जीर्णोद्धार अहिल्याबाईंनी केला.
13 ऑगस्ट 1795 रोजी अहिल्याबाई होळकर यांचे निधन झाले.