मुंबईतील मरीन ड्राइव्हवर बसून सुर्यास्ताची मजा लुटण्याचा आनंद वेगळाच आहे. या ठिकाणी पोहोचण्यासाठी मरीन लाइन्स स्टेशनला उतरावे लागेल.
मलबार हिल्स येथील हँगिग गार्डनला तुम्ही 100 रुपयांत भेट देऊ शकता. या गार्डनमध्ये फ्री एन्ट्री असून वेगवेगळ्या प्रकारची फुलंझाडे येथे पहायला मिळतील.
गेटवे ऑफ इंडियाच्या समोरच असणारे मुंबईतील आयकॉनिक हॉटेल ताजला भेट देऊ शकता. ताजच्या समोरच असणाऱ्या समुद्राचा आनंद घेऊ शकता. येथे पोहचण्यासाठी सीएसएमटी स्थानकात उतरावे लागेल.
जुहू बीचवर सकाळ किंवा संध्याकाळ या दोन्ही वेळेस नागरिकांची वर्दळ पहायला मिळते. खरंतर, जुहू बीचवर मिळणाऱ्या चौपाटी स्नॅक्सचा आनंद घेण्यासाठी बहुतांशजण येतात.
भायखळा येथे असणाऱ्या राणी बाग म्हणजेच वीर जिजामाता उद्यानाला 100 रुपयांत भेट देऊ शकता. येथील वाघ, सिंह, हत्ती किंवा पेंग्विन पाहण्यासाठी लहान मुलांना नक्कीच घेऊन जा.
मरीन ड्राइव्ह शेजारी असणाऱ्या तारापोरवाला मत्सालयाला 100 रुपयांत भेट देऊ शकता. येथे वेगवेगळ्या प्रजातींचे मासे पहायला मिळतील.
मुंबईतील वांद्रे फोर्ट आणि येथून दिसणारा वरळी सी-लिंकचा व्हू पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. या ठिकाणी भेट देण्यासाठी वांद्रे स्थानकात उतरावे लागेल.
गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेलची सफर केल्यानंतर खरेदी करण्यासाठी नक्कीच कुलाबा कॉजवेला भेट द्या. या ठिकाणी ट्रेन्डी आणि फॅशनेबल आउटफिट्स ते ज्वेलरी खरेदी करता येईल.
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची सफर मित्रपरिवारासोबत येऊ शकता. येथे एन्ट्रीसाठी शुल्क भरावे लागतात. याशिवाय उद्यानाच्या वरच्या टोकाला कान्हेरी लेणीही आहे.
नेपन्सी रोडवरील समुद्र किनाऱ्याला लागूनच असणाऱ्या प्रियदर्शनी पार्कलाही भेट देऊ शकता. येथून दिसणारा सुर्यास्त पाहण्याजोगा असतो.